जशी विधानसभा निवडणूक जवळ येत आहे तसे अमळनेरचं राजकारण तापायला सुरवात झाली आहे. अनिल पाटील थेट कॅबिनेट मंत्री असुनसुद्दा आपली आमदारकी टिकण्याची शाश्वती त्यांना दिसत नाहीये. त्यामुळेच हा धोका टाळ्यासाठी आता खोका तर बाहेर काढला जात नाही ना असा प्रश्न अमळनेरकरांना पडला आहे. कारण त्यांच्या विरोधातला माणूस आपल्या बाजूने करण्यासाठी धुळ्याच्या हॉटेलवर बैठक झाल्या. यात माजी आमदार साहेबराव पाटलांना नेमक कीती कोटीच कोंबड खायला घातलं याचा ढेकर मात्र हॉटेलच्या बाहेर आला नाही. दरम्यान अमळनेरकर मात्र या राजकारणावर चांगलच तोंडसूख घेत आहेत.
"आमची भेट राजकीय नव्हती आजी आजारी होत्या म्हणून आम्ही भेटलो." वा रे? अहो किती पलटणार तुम्ही. त्या बिचाऱ्या सरड्याला का बदनाम करता. आपली आमदारी धोक्यात बघून मिळतील ते सोबत घेण्याच्या धडपडीत असलेले हे आपले मंत्री साहेब. पुढच्या तीन महिन्यात किती पलट्या घेणार हेच पहायच रहायलयं आता फक्त.