शवयात्रा निघाली चिखल तूडवीत : अमळनेर नगरपरिषदे विरोधात नागरिकांचा तिव्र असंतोष

अमळनेर शहरात विधानसभेच्या धर्तीवर हजारो कोटी रुपयांच्या विकासकामाच्या गप्पा सुरु आहेत मात्र खऱ्या वास्तवाची झळ इथल्या सामान्य नागरिकाला सोसावी लागत आहे. शहराच्या जपान जीन भागातून गेलेल्या अंतयात्रेला अक्षरशः चिखलातून आणि खड्यातून वाट काढत जाण्याची वेळ आली. अमळनेर शहरातील जपान जीन भागातील नागरिकांनी मागील वर्षभरात तीन-चार वेळा निवेदन देऊनही याच्याकडे कानाडोळा केला जात आहे अशी माहीती येथिल नागरिकांनी दिली. सामान्य जनतेकडून कर वसुली करताना कुठलीही कसर न सोडणारी पालिका सुविधा देण्यात मागे का पडत आहे असा प्रश्न येथिल नागरिक विचारत आहेत. 


हॉटेलात बसून नगरपालिकेची डील झाल्यावर रस्त्याची काळजी कोण करणार?

     दरम्यान काही दिवसांपुर्वीच तालुक्याच वातावरण अनिल पाटील आणि साहेबराव पाटलांच्या धुळ्यात एका हॉटेलवर झालेल्या भेटीने चांगलच तापलं होत. आमदारकी आणि नगरपालिका अशी डील झाल्याची चर्चा तालुक्याच्या राजकीय परिघात होती. या नेत्यांच्या राजकारणात मात्र सामान्य जनतेला प्राथमिक सुविधांपासून वंचित रहाव लागत असल्याचे पहायलं मिळत आहे.




Post a Comment

Previous Post Next Post