'पिस्तूल क्वीन मनू भाकर'

 पिस्तूल क्वीन मनू भाकर

ऑलिंपिकमध्ये मनू भाकरने ब्राँझ पदकाची कमाई केली आहे. भारताची २२ वर्षीय महिला नेमबाज मनूने रविवारी  फ्रान्समधील शूटिंग रेंजवर अचूक लक्ष्य साधून ऐतिहासिक यश संपादन केले. 'पिस्तूल क्वीन' मनू हिने दहा मीटर एअर पिस्तूल प्रकारात ब्राँझपदकावर मोहर उमटवत भारताचे पॅरिस ऑलिंपिकमधील पदकाचे खाते रुबाबात उघडले. ऑलिंपिकच्या इतिहासात नेमबाजी या खेळात पदक जिंकणारी ती भारताची पहिली महिला नेमबाज ठरली. भारताने १२ वर्षांनंतर नेमबाजीत पदकावर निशाणा साधला. जागतिक अजिंक्यपद स्पर्धा, विश्वकरंडक, आशियाई स्पर्धा, आशियाई अजिंक्यपद स्पर्धा, राष्ट्रकुल स्पर्धा अशा विविध स्पर्धामध्ये घवघवीत यश संपादन करणाऱ्या मनू भाकर हिला यापूर्वी ऑलिंपिकमध्ये पदक जिंकता आले नव्हते




Post a Comment

Previous Post Next Post