महायुतीची लवकरच समन्वय समिती
महाविकास आघाडीपेक्षाही महायुतीकडे
इच्छुकांची संख्या जास्त असल्यामुळे तीनही पक्षांमध्ये जागावाटपाबाबत एकमत व्हावे, यासाठी लवकरच समन्वय समिती स्थापन करणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी केली. नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सहा आमदार असून, इच्छुकांनी नाशिक पश्चिम, नाशिक मध्य, इगतपुरी-त्र्यंबकेश्वर, बागलाण व नांदगावच्या जागेची मागणी केली आहे.
यात्रेपूर्वी दोन दिवस नाशिक दौऱ्यावर आलेल्या खासदार तटकरे यांनी रविवारी मुंबई नाका येथील राष्ट्रवादी भवनात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला ते म्हणाले, की जनतेच्या मनातीत रोष लोकसभा निवडणुकीत निघून गेला आहे. आता विधानसभा निवडणुकीत महायुतीलाच कौल मिळेत तीन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची जागावाटपाच्या अनुषंगाने बैठक झाली. राज्यात एकत्रितपणे नियोजन करण्याच्या दृष्टीने दोन दिवसांत चर्चा होणार आहे. स्वबळावर लढण्याचा प्रश्नच नसून चर्चेचा तपशील जाहीर केला जाईन. निवडून येण्याची क्षमता हा निकष असून, जागावाटपाबाबत कुठलेही मतभेद नसल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले