तमन्नाच्या वाढदिवशी 'आज की रात'चे शूट
हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांतील अभिनयामुळे तमन्ना भाटिया सध्या खूप चर्चेत आहे. उत्तम अभिनयासोबतच तिच्याकडे चांगले नृत्यकौशल्यही आहे. 'स्त्री २'मध्ये तिचे हे कौशल्य प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटातील तमन्ना हिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या ट्रॅकला प्रेक्षकांची पसंतीही मिळत आहे. तिच्या वाढदिवशी पाच डिग्री सेल्सिअस तापमानात या गाण्याचे चित्रीकरण करण्यात आले. नृत्यदिग्दर्शक विजय गांगुली यांनी नुकताच एका मुलाखतीत याबाबत खुलासा केला. तमन्ना म्हणाली, "हे गाणे पाच डिग्री सेल्सिअस तापमानात शूट करण्यात आले. हे खूपच आव्हानात्मक होते; पण खूप मजाही आली. माझ्या वाढदिवशी या गाण्याचे चित्रीकरण झाल्याने ते माझ्यासाठी खास आहे. या गाण्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याने उत्साहित आहे." 'खी २' व्यतिरिक्त तिचा आगामी तेलगू चित्रपट 'ओडेला २' उवकरच प्रदर्शित होणार आहे. याशिवाय तिच्याकडे 'वेद' आणि एक ओटीटी प्रोजेक्ट 'डेअरिंग पार्टनर्स' हे हिंदी चित्रपटदेखील आहेत