कॅबीनेट मंत्र्यांच्या मतदारसंघात आरोग्य यंत्रणा अर्धमेल्या अवस्थेत

राज्यात सर्वत्रच विधानसभा डोळ्यासमोर ठेऊन सत्ताधारी आमदारांकडून विविध योजनांच्या जाहिराती प्रसिद्ध होत आहेत. अनूदानाचा पाऊसंच मतदारांवर पाडण्याच्या विचारात सरकार आहे. मात्र प्राथमिक गरजांपासून सामान्य जनता वंचित रहावे लागत आहे. अमळनेरचे आमदार राज्याचे विद्यमान मदत, पुनर्वनसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटलांच्याच मतदार संघातील आरोग्य यंत्रणा खिळखिळी असल्याचे दिसत आहे. तालुक्यातील आरोग्य विभागाच्या एकूण ११६ जागांपैकी तब्बल ५३ पदे अजूनही रिक्त आहेत. सर्वत्र साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव असताना खुद्द कॅबीनेट मंत्र्यांच्या मतदारसंघात ही स्थिती पाहून सामान्य जनता मात्र आपली अडचण आपणच सोडवू अशा भुमिकेत आहे. 

गर्भवती महिलांना वेळेवर मिळत नाही रुग्णवाहीका
गर्भवती महिलांसाठी प्रसुतीच्या वेळी चालक उपलब्ध नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आर्थिक स्थिती खराब असलेल्या गरीब कुटुंबांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार आहे. याची जबाबदारी लोकप्रतिनिधींची आहे की नाही? तुमच्या विकासाच्या व्याख्येत अमळनेरची आरोग्यव्यवस्था येते की नाही असा सवाल नागरिक विचारत आहेत







Post a Comment

Previous Post Next Post