ढगाळ वातावरणाचा पिकांवर परिणाम : अमळनेर तालुक्यात कापूस पीकाला धोका

सततच्या ढगाळ वातावरणाने अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्याची चिंता वाढली आहे. गेल्या आठवड्याभरात पिकांना कसलाच सुर्यप्रकाश मिळत नसल्याने त्याच्यावर रोगराईचे पसरण्याचे संकट उभा ठाकले आहे. तालुक्यातील मुख्य पिक असलेल्या कापसाच्या पिकाचा रंग पिवळा पडत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. दरवर्षी पाऊस नसल्यामुळे अडचणीत सापडणारा शेतकरी यावेळी मात्र वेळेवर मान्सुन येऊन देखील चिंतेत आहे.


सततचे ढगाळ वातावरण आणि अधून-मधून येणाऱ्या पावसामुळे धड औषध फवारणी करता येत नाही आणि खुरपणी सुद्धा करता येत नाही. यंदाच्या मोसमाची सुरवात चांगली झाल्याने पिकाची वाढ जोमात झालेली आहे. मात्र पिकाला प्रकाशच मिळत नसल्याने हे वातावरण पिकाला घातक ठरत आहे.



Post a Comment

Previous Post Next Post