महाराष्ट्र सरकारकडून राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादन शेतकऱ्यांसाठी अनुदानाची घोषणा करण्यात आली आहे. मागील वर्षीच्या खरीप हंगामात कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना रशिया-युक्रेन युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खुप कमी भाव मिळाला होता. याचाच परतावा म्हणून २०२३ च्या खरीप हंगामासाठीचा प्रति हेक्टरी ५ हजार रुपयाप्रमाणे भरपाई देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. यासाठी ४ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. याकरीता २ हेक्टर पर्यंतची मर्यादा असल्याचे शासन निर्णयात सांगण्यात आले आहे.
देवेंद्र फडणवीसांनी पाळला शब्द
दरम्यान लोकसभेपुर्वीच याची अंमलबजावणी झाली असती परंतु आचारसंहितेमुळे ही रक्कम जमा होऊ शकलेली नाही. त्यामुळे आचारसंहिता संपल्यावर हे अनुदान शेतकऱ्यांना मिळेल अशी घोषणा लोकसभा निवडणूक प्रचारात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. यामुळे आत्ता याची अमंलबजावणी करण्यात येत आहे. दरम्यान यावर्षी मात्र पावसाने शेतकऱ्याला चांगली सोबत केल्यामुळे आणि मागील वर्षीची भरपाई मिळणार असल्यामुळे शेतकरी राजासाठी ही आनंदाची बातमी आहे. संबंधित अनुदान हे थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे