कालपासून (९ ऑगस्ट) जागतिक आदिवासी दिवस साजरा होत असताना मंत्री अनिल पाटलांचा एक व्हिडिओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यांना मंत्रीपद मिळताच त्यांनी अशी काय चुक केली होती ज्यामुळे आदिवासी समाज त्यांचा विरोध करताना पहायला मिळत आहे. या बातमीच्या माध्यमातून सविस्तर समजून घेऊयात.
नेमकं प्रकरण काय आहे?
साधारण वर्षभरापुर्वी अनिल भाईदास पाटील यांना अजित पवार गटातून कॅबीनेट मंत्री पदाची लॉटरी लागली. स्वप्नातही मंत्री पदाची अपेक्षा नसलेल्या अनिल पाटील यांनी मतदारसंघात त्यांच्या जंगी स्वागताची तयारी करायला सांगीतली. आता भव्य रोड शो करायला निष्टावंत कार्यकर्त्यांची कमतरता होतीच आणि हिच कमी भरुन काढण्यासाठी एका आदिवासी आश्रम शाळेतील मुला-मुलींना यांच्या स्वागतासाठी रस्त्यावर थांबायला सांगण्यात आले. बरं इथवर मंत्री साहेब थांबले नाहीत तर हे गाडीतून उतरल्यावर यांना सर्वांनी सॅल्युट मारायचा अशा सुचना देण्यात आल्या. अनिल पाटलांचा ताफा यायच्या अगोदर या मुलांना २ ते ३ तास भर दुपारी उन्हात रस्त्याच्या कडेला बसवण्यात आलं. या सगळ्या घटनांची दखल जेव्हा टिव्ही चॅनेल्सनी घेतली आणि आदिवासींच्या लेकरांना असं उन्हात उभा करुन त्यांच्याकडून सलामी घेण्याचे अधिकार यांना कुणी दिले असे विचारले गेले तेव्हा मात्र या महाशयांनी यांचे हात झाडत मी असे कृत्य करणारचं नाही असे सारवासारवीचे उत्तर दिले.
आत्ता याची चर्चा का होत आहे?
काल(९ ऑगस्ट) जागतिक आदिवासी दिनाच्या निमीत्ताने मंत्री अनिल पाटील यांनी शुभेच्छांचे बॅनर अमळनेर शहरात लागले आणि काही आदिवासी बांधवांना हे खोट प्रेम आवडलं नाही. त्यांनी आदिवासी समाजाला आव्हान करत या पुढाऱ्याचा कपटीपणा ओळखा. याला निवडणूका जवळ आल्यावरच आदिवासींना जवळ करायचे असतात. प्रत्यक्षात सत्ता आली की आपल्या गरिब आदिवासी लेकरांना भर उन्हात उभा करायला याला थोडीही शरम वाटत नाही. या घटनेची माफी मागावी असे सुद्धा त्यावेळी या अनिल पाटीलला वाटलं नव्हत. त्यामुळे आत्ताचं त्यांच आदिवासी प्रेम खोट आहे. त्याचा खरा चेहरा लक्षात असुद्या. असा आशय असणारा व्हिडीओ आणि बॅनर सर्वत्र व्हायरल होत आहेत.
अनिल पाटील आदिवासी समाजाची माफी मागणार का?
या प्रकरणानंतर आता वर्षभरापुर्वी केलेल्या या चुकीची माफी अथवा स्पष्टीकरण मंत्री अनिल पाटील देणार का? का नेहमीप्रमाणे आदिवासींना गृहीत धरणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. दरम्यान अमळनेर मतदारसंघात आदिवासी समाजाचे चांगले मताधिक्य असुन त्यांनी ठरवल्यावर येणाऱ्या विधानभेला याचा मोठा फटका अजित पवार गटाचे मंत्री अनिल पाटील यांना होऊ शकतो असे जाणकार सांगत आहेत.
हे ही वाचा :