अनिल पाटील बहुजनांना किती दिवस वेड्यात काढणार? - डॉ. रवींद्रबापू चौधरी



आमदारकी, मंत्रिपद मिळवून सर्वसामान्य अमळनेरकरांची पदरी निराशा टाकणारे अनिल पाटील यांची आगामी विधानसभा निवडणुकीत स्वतःच्या समाजात मत विभागणी होणार हे निश्चित झाल्याने बहुजन समाजातील लोकांना नंदुरबार येथे घेऊन जात आपला 'पालकमंत्री म्हणून थाट दाखवायचा घाट' नामदार अनिल पाटील यांनी घातला असून शिरिषदादा चौधरी यांची धास्ती घेतल्यानेच ही नौटंकी सुरू असल्याचा आरोप डॉ. रवींद्र चौधरी यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

एखा‌द्या मंत्र्यांचे काम काय आहे ?

एखादा मंत्री जनसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्या पदावर विराजमान होतो ना कि स्वतःचा रुबाब जनसामान्यांनवर गाजवण्यासाठी, अनिल पाटील यांना हे मंत्रिपद कश्यासाठी आहे हेच ठाऊक नाही. पालकमंत्री म्हणून कुठल्याही मंत्र्यांचा सन्मान होतो हे नविन नाही, पण माझा काय रुबाब आहे हे अमळनेर विधानसभा मतदार संघातील सामान्य जनतेला दाखवण्यासाठी नामदार पाटील यांचा सध्या खटाटोप चालू आहे.

ताटातले खुंटले म्हणून बहुजनांकडे मागितले !

विधानसभा मतदार संघातील बहुजन समाजातील सर्वसामान्य लोकांना शंभरावर वाहने करून नंदुरबार येथे घेऊन जाणे, पाया देऊन खुश करणे, रोज तिथे त्यांना स्वतःच्या मंत्रिपदाचा रुबाब दाखवीणे व नंतर आमच्या बहुजन सामान्य जनतेला वाऱ्यावर सोडणे, असा हा निवडणुकी पुरता फंडा सध्या नामदार पाटील करत आहेत. स्वतःच्या ताटातले खुटले म्हणून अनिल पाटील यांनी बहुजनांकडे हात पसरल्याचा आरोप डॉ. रवींद्र चौधरी यांनी केला आहे

अमळनेर तालुक्यातील जनतेने नंदुरबार पाहिले नाही का? त्यांना अचानक नंदुरबार घेऊन जाण्याचे प्रयोजन काय? असा सवाल उपस्थित करून बहुजन बांधवांनी प्रलोभनास बळी पडू नये असे आवाहन डॉ. रवींद्र चौधरी यांनी केले आहे. याच दरम्यान काही दिवसापूर्वी आमचे ठरले आहे म्हणून ज्या साहेबरावदादा यांच्याशी मैत्री केली त्यांनी अचानक यु टर्न घेतल्याची भीती व शिरिषदादा यांची वाढती ताकद पाहून नामदार अनिल भाईदास पाटील असा पोरखेळ करीत असल्याचा आरोप शिरिषदादा चौधरी मित्र परिवाराने केला आहे

Post a Comment

Previous Post Next Post