सोबत नसतांना सोबत असल्याचे मंत्र्यांचे नाटक..
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात सोमवारी राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा अमळनेर मध्ये आली होती. मंत्री पाटील माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या सोबत सर्वकाही ठीक असल्याचे दाखवत असतांना माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या निवासस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी आयोजित चहापानाच्या कार्यक्रमास साहेबराव पाटीलच अनुपस्थित राहिल्याने यावर मंत्री पाटील यांनी पत्रकारांशी बोलतांना केलेले वक्तव्य 'आमचे ठरले आहे.. ठरल्याप्रमाणेच कार्यक्रम होणार' या वर प्रश्न चिह्न निर्माण झाले आहेत.
हे काय घडले पाहुणचार करायला घरचीच मंडळी अनुपस्थित ।
माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या निवासस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी आयोजित चहापानाच्या कार्यक्रमास साहेबराव पाटील अनुपस्थित राहिल्याने अमळनेर विधानसभा मतदार संघातील राजकारणात यु टर्न.
मध्यंतरी मंत्री अनिल पाटील यांच्याशी सलोखा घडण्याच्या विषयावर राजकीय वर्तुळात झालेली नाचक्की पाहत व्यथित झाल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटण्याची मनःस्थिती झाली नाही, असे माजी आमदार साहेबराव पाटील यांनी स्पष्ट केले आहे. या मुळे ते चहापानाच्या कार्यक्रमास अनुपस्थित राहिल्याचे समजते.
जनसामान्यांना प्रश्न असे काय ठरले तुमचे
मंत्री अनिल पाटील यांना या साहेबरावांनी चकवा दिला याविषयी पत्रकारानी विचारल्यावर, कृषिभूषण पाटील व माझ्यात काही गोष्टी ठरल्या आहेत. त्या ठरल्याप्रमाणेच होणार असे वक्तव्य केले आहे. पण जनसामान्य नागरिकांमध्ये प्रश्न पडले आहेत माझी आमदार साहेबराव पाटील व मंत्री अनिल पाटील यांच्यात असे काय ठरले आहे त्यात अमळनेर विधानसभा मतदार संघातील जनसामान्यांचे प्रश्न सुटणार आहेत का? कि स्वतःचे राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी दोघांची हि धडपड आहे ?