अमळनेर विधानसभेसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष्याकडून उमेश पाटील इच्छुक
या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी अमळनेर विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी शरद पवार पक्ष्याकडून पक्ष्याचे गग्रंथालय विभागाचे प्रदेश अध्यक्ष उमेश पाटील इच्छुक असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.
उमेश पाटील म्हणाले विद्यार्थीदशे पासून ते शरद पवारांना आदर्श मानतात व शरद पवारांच्या विचारांवर ध्येय धोरणावर चालण्याची शपथ त्यांनी घेतली आहे. पुढे ते म्हणाले राष्ट्रवादी पक्ष्याच्या स्थापनेपासून (1999) ते शरदचंद्र पवार साहेबांसोबत आहेत. त्यांनी राष्ट्रवादी च्या वाढी साठी गाव, तालुका, जिल्हा पातळीवर पक्ष वाढीसाठी काम केले आहे या कामाची पोच पावती म्हणून शरदचंद्र पवार साहेबांनी त्यांना पक्ष्याच्या ग्रंथालय विभागाचा प्रदेश अध्यक्ष म्हणून नेमणूक केली आहे. व मागील लोकसभा निवडणुकीत त्याच्यावर खडकवासला मतदार संघाची पक्ष निरीक्षक म्हणून नियुक्ती केली होती.
पुढे ते म्हणाले अजितदादांनी जेव्हा शरद पवार साहेबांची साथ सोडली तेव्हा अमळनेर मधील स्थानिक नेत्यांनी पण पवार साहेबांची साथ सोडली या मुळे आम्ही पक्ष आमचा संपला, आत्ता पवार साहेबांची राष्ट्रवादी संपली अश्या टीका सहन केल्या पण आत्ता पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवारांनी त्यांची ताकत दाखवून दिली व लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश संपादन केले व पक्षाची साथ सोडणाऱ्यांना त्यांची जागा आम्ही मागच्या लोकसभा निवडणुकीत दाखवली आहे.
या दरम्यान ते म्हणाले मला अमळनेर ची बारामती करायची आहे म्हणजे बारामती चा विकासाचा पॅटर्न त्यांना अमळनेर विधानसभा मतदार संघात राबवयाचा आहे म्हणून त्यांना आगामी विधानसभा निवडणूक लढवायची आहे जर मला निवडून दिले तर शेतकऱ्यांचे प्रश्न असो, तरुणांचा रोजगाराचा प्रश्न असो, शेतीच्या सिंचनाचा प्रश्न पाडळसारे धारणाचा प्रश्न असो असे कित्येक प्रश्न ते यशस्वी पणे मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे त्या साठी लोकांनी माझ्यावर एकदा एका एकनिष्ठ कार्यकर्त्यावर विश्वास टाकणाचे आव्हान त्यांनी केले आहे.