अमळनेर- पश्चिम बंगाल येथील कोलकाता सरकारी रुग्णालयात एका महिला डॉक्टरवर काही नराधमांनी अत्याचार करुन त्या महिला डॉक्टरचा निर्घृण हत्या केल्याची निंदनीय घटना घडल्या प्रकरणी या अमानवीय कृत्याच्या निषेधार्थ देशभरात डॉक्टरांचा बेमुदत संप सुरू असतांना अमळनेर तालुक्यातील डॉक्टर्सनी उपविभागीय अधिकारी दंडाधिकारी कार्यालयात आज निवेदन दिले आहे.
पश्चिम बंगाल येथील कोलकाता सरकारी रुग्णालयात घडलेली ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी असुन या घटनेतील नराधमांना तात्काळ फासावर लटकवण्यात यावे या प्रकरणातील सर्व आरोपींना लवकरात लवकर पकडून त्यांना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी या निवेदनात तालुक्यातील डॉक्टर्सनि केली आहे.
डॉक्टरांना हॉस्पीटल मध्ये काम करतांना कुठलीही भिती वाटली नाही पाहिजे या पध्दतीचे कठोर कायदे शासनाने आणावेत व देशातील सर्वच डॉक्टर महिलांच्या सुरक्षेसंदर्भातील उपाय योजना कठोर करण्यात याव्यात अशा आशयाचे निवेदन १७ ऑगस्ट रोजी तालुक्यातील डॉक्टर्सतर्फे अमळनेर उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले आहे. निवेदन देते वेळी तालूक्यातील सर्व डॉक्टर उपस्थित होते.