अमळनेर तालुक्यात विधानसभा निवडणूकीच्या दृष्टीने राजकीय घडामोडींना वेग आलेला असताना दुसरीकडे नागरिक मात्र अजूनही त्यांच्या मुलभूत गरजांपासून वंचीत असल्याचे पहायला मिळत आहे. मुडी प्र. डांगरी परिसरातील लोकांना सततच्या वीजपूरवठा चालु-बंदच्या प्रकारामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. लाईट कधी जाईल याचा काही नेम न राहिल्याने तालुक्याच्या मुडी परिसरातील नागरीक पुरते बेजार झाले आहेत.
लोकप्रतिनिधींच दुर्लक्ष
लोकांची ही अडचण दुर करण्यासाठी अनेकदा मागणी करुनही लोकप्रतिनीधी मात्र याच्याकडे साफ दुर्लक्ष करत असल्याचे येथिल नागरिकांनी सांगीतले. भरवस सबस्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या मूडी, मांडळ, लोण बु, कळंबे, बोदर्डे लोण चारम, लोण खुर्द या गावांना याचा खुप त्रास होत असल्याचे चित्र आहे. सोबतच महावितरणच्या अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देणे सुरु केले आहे. एकप्रकारे स्थानिकांना कोण वालीच राहिला नसल्याचे पहायला मिळत आहे.