सौ. अनिता शिरीष चौधरी यांची अमळनेर मतदार संघातील भावांना राखी भेट.




अमळनेर- आज या भाऊ-बहिणीच्या नात्याला अधिक दृढ करणा-या सणा दिवशी सौ. अनिता शिरीष चौधरी यांनी अमळनेर विधानसभा मतदार संघातील कार्यकर्ते व चौधरी कुटुंबाशी स्नेह ठेवणार्यांना या रक्षाबंधनदिनी एक राखी व भावनिक पत्र पाठवले आहे.


त्यांनी या पत्राद्वारे मतदार संघातील अनेकांना रक्षाबंनधनाच्या शुभेच्छा दिल्यातच पण त्या बरोबर एक भावनिक पत्र पाठवून त्यांनी आगामी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतदार संघात शिरीष चौधरी यांच्या पाठीमागे उभे राहण्याचे आव्हान त्यांनी अनेकांना या पत्राद्वारे केले असे समजते.


त्यांनी या पत्राद्वारे अमळनेरचे भविष्य सुरक्षित, उज्ज्वल आणि अखंड विकसित करण्यासाठी. पुढच्या पिढीच्या भविष्याला उज्वल करण्यासाठी शिक्षणात आणि रोजगारात मोठ्या प्रमाणात आताच सर्वसमावेशक विकासाची पायाभरणी करण्यासाठी. बळीराजाला बळ देण्यासाठी, त्याचे दुःख निवारण्यासाठी, बळीराजाला सक्षम करण्यासाठी, आपल्या अमळनेर तालुक्याच भविष्य उज्ज्वल करण्यासाठी शिरीषदादांच्या सोबत खांद्याला खांदा लावून प्रत्येकाने पुन्हा एकदा अधिक जोमाने उभा रहावे हि विनंती त्यांनी या पत्राद्वारे अमळनेर मतदार संघातील नागरिकांना केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post