अमळनेर: शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यात खासदार संजय राऊत यांनी अमळनेरचे आमदार अनिल पाटील यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली. "अनिल पाटील हे लाचार आणि लोचट आमदार आहेत, ज्यांनी स्वार्थासाठी शरद पवारांच्या मागे धावण्याचे काम केले," असे स्पष्टपणे सांगत त्यांनी पाटील यांच्या राजकीय कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
राऊतांनी पाटील यांच्या नेतृत्वाखालील अमळनेरच्या विकासावर नाराजी व्यक्त करताना सांगितले की, "अनिल पाटील यांचा सर्वस्वी एककलमी कार्यक्रम म्हणजे फक्त स्वत:चा फायदा."
"आमदाराने अमळनेरच्या जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याऐवजी स्वतःच्या स्वार्थाला प्राधान्य दिले," असे सांगून राऊतांनी पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांनी शिवसैनिकांना आवाहन केले की, "अशाm लाचार नेत्यांविरुद्ध तयार राहा, आणि गद्दारांपासून सावध रहा."
राऊतांनी राज्य सरकारच्या निष्क्रियतेवरही कडाडून टीका केली आणि सांगितले की, "अनिल पाटील यांनी आपल्या मतदारसंघाचा आवाज दाबण्याचे काम केले आहे, परंतु शिवसैनिकांनी हा आवाज पुन्हा बुलंद करावा."
तसेच, त्यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना अशा नेत्यांपासून सावध राहण्याचे आवाहन केले आणि आगामी निवडणुकीत पाटील यांना धडा शिकवण्याचे आवाहन केले.