अमळनेरला पावसाची चांगलीच झळ; मा.आ. शिरीष चौधरींनी केली तातडीची मदत

काल अमळनेर शहरात मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे संताजी नगर, गुरुकृपा कॉलनी, संतप्रसाद नगर, ढेकू रोड या भागांमध्ये पाणी साचून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. पाण्याच्या तुंबलेल्या अवस्थेमुळे नागरिकांना घराबाहेर पडणेही अवघड झाले.

या पाणीसाचल्यामुळे शहरातील नगरपरिषदेची अकार्यक्षमता समोर आली. नागरिकांच्या या समस्या लक्षात घेऊन माजी आमदार शिरीष चौधरी यांनी त्वरित या भागांना भेट दिली. त्यांनी नागरिकांची समस्या जाणून घेतली आणि तत्काळ जेसीबी पाठवून पाण्याचा निचरा करण्याचे आदेश दिले. चौधरी यांच्या या तात्काळ कारवाईमुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला.

Post a Comment

Previous Post Next Post