महाराष्ट्रातील कोल्हापूरच्या ग्रामीण भागातून असलेल्या स्वप्निल कुसाळेने पॅरीस ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदकाची कमाई केल्यापासून सर्वांकडूनच त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. दरम्यान मोठमोठी बक्षीस देखील त्याला मिळत आहेत. महाराष्ट्राची मान उंचावणाऱ्या स्वप्निलला आता महाराष्ट्र सरकारनेही मोठ्या बक्षीसाची घोषणा केली आहे. यामुळे अतिशय बिकट परिस्थितीतून आलेला स्वप्निल आता करोडपती बनणार आहे.
आजी म्हणते आल्यावर त्याचा मुकाचं घेईन
दरम्यान माध्यमांचे कॅमेरे थेट स्वप्निलच्या घरापर्यंत जाऊन पोहोचले. स्वप्निलच्या आजी म्हणाली की, "माझा नातू आल्यावर पहिल्यांदा मी त्याचा मुका घेईन." सामान्य लोकांच्या ह्या भाबड्या प्रतिक्रिया असतात. स्वप्निल देशातील त्या सर्व सामान्य कुटुंबांच प्रतिनिधीत्न करणारा आहे. माध्यमांशी बोलताना तो म्हणाला की, "मी तर धोनीचा फॅन आहे. त्याच्यासारख कुल राहूनच मी हे यश संपादीत केलं. मी सुद्धा धोनीसारखाच टिसी म्हणून काम करत आहे."
महाराष्ट्र सरकारकडून बक्षीसाची रक्कम जाहीर
खशाबा जाधव यांच्यानंतर वैयक्तिक स्पर्धेत पदक मिळवून देणारा स्वप्निल कुसाळे दूसरा ऑलिंपिक खेळाडू "ठरल्याने महाराष्ट्र सरकारने आता त्याला १ कोटी रुपयाच्या बक्षीसाची घोषणा केली आहे. यामुळे आता देशाचा नाव उज्वल करणारा स्वप्निल कोट्याधीश होणार आहे.
हे ही वाचा :