दि. 26/08/2024 रोजी खान्देश मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय (स्वायत्त ) अमळनेर, राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान आणि वाणिज्य व व्यवस्थापन प्रशाळेच्या वतीने वाणिज्य पदवी स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी परिव्यय लेखांकनातील करियरच्या संधी तसेच पदव्युत्तर स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी वाणिज्य व व्यवस्थापन शाखेतील नेट-सेट स्पर्धा परीक्षांची तयारी या दोन्ही विषयांवर संगमनेर येथील डी. जे.मालपाणी स्वायत्त महाविद्यालयाचे प्रा. डॉ. संदीप वडघुले यांच्या दोन व्याख्यानांचे आयोजन केले होते, त्यातील आपल्या पहिल्या व्याख्यानात त्यांनी NET /SET परीक्षेचे स्वरूप,आवेदन करण्याची पद्धती,पात्रतेच्या अटी, अभ्यासाची कार्यपद्धती याबद्दल विस्तृत माहिती दिली.
दुसऱ्या व्याख्यानात ते म्हणाले की परिव्यय लेखांकन (Cost Accounting) हा व्यवसाय क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण भाग आहे, ज्यामध्ये उत्पादन आणि सेवांच्या किमती ठरवण्याचे तंत्र समाविष्ट असते. यामध्ये कंपनीच्या आर्थिक व्यवस्थापनाचा पाया मजबूत करण्यासाठी माहिती पुरवली जाते. परिव्यय लेखाकनातील करिअरच्या संधी खूप विस्तृत आहेत आणि विविध उद्योगांत उपलब्ध आहेत. त्यामुळे वाणिज्य व व्यवस्थापनाचे शिक्षण ही काळाची गरज असून उद्याचे भविष्य हे कॉमर्सचे आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान खान्देश शिक्षण मंडळाचे चिटणीस तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण बी. जैन यांनी भूषविले. तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य व वाणिज्य व्यवस्थापन प्रशाळेचे संचालक डॉ. योगेश तोरवणे, विभागातील प्राध्यापक डॉ. ज्ञानेश्वर मराठे, डॉ. किरण सुर्यवंशी, डॉ. किरण भागवत, डॉ. अनिल झळके, डॉ. बालाजी कांबळे, प्रा. लुनकरण चोरडिया, प्रा.कपिल मनोरे यांनी मेहनत घेतली. विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने हजर राहून या व्याख्यानांचा लाभ घेतला व चांगली माहिती मिळाल्याबद्दल सकारात्मक प्रतिकिया देखील व्यक्त केल्या.
या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन व व्यवस्थापन वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांनी केलेले होते, त्यात सूत्रसंचालक म्हणून कु. अंकिता सावंत, कल्याणी वाणी यांनी यशस्वी भूमिका पार पाडली. तसेच कृतिका मुंदडा, जागृती चौधरी यांनी आभार प्रदर्शन केले. नियोजनात वाणिज्य शाखेचे विद्यार्थी तन्मय नेरकर, तन्मय पाटील,जानवी शिंदे,दिनेश बारेला तसेच सागर कोळी यांचा विशेष सहभाग होता.