अमळनेर तालुक्यातील एका गावात १२ वर्षीय मुकबधिर मुलीवर अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बुधवारी, २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसात वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात ७० वर्षीय राजधर अंबर सैंदाणे या वृद्धावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची सविस्तर माहिती अशी आहे की, अमळनेर तालुक्यातील एका गावात १२ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. पीडित मुलीची आई मजुरी कामासाठी अहमदनगर येथे गेली होती. या संधीचा फायदा घेत, १४ ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे १२.३० वाजता गावात राहणाऱ्या संशयित आरोपी राजधर सैंदाणे याने पीडित मुलगी अंगणात खेळत असताना तिला घरात बोलावले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार गावातील एका आजीने पाहिला आणि तिने फोन करून पीडित मुलीच्या आईला कळवले. आई घरी परतल्यानंतर, २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसात वाजता ती अमळनेर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. त्यानुसार, संशयित आरोपी राजधर सैंदाणे या नराधमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक अक्षदा इंगळे या करीत आहेत.