जळगाव: जळगाव आत्तापर्यंत समाधानकारक पाऊस झाला आहे. मंगळवारी काही प्रमाणात पावसाने दिलासा दिला असला तरी गुरुवारी हवामान खात्याकडून जिल्ह्यासाठी 'यलो अलर्ट' जारी करण्यात आले आहे. गुरुवारी जिल्ह्यात ३० ते ४० किमी वेगाने वादळी वारे वाहण्यासह जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीचा ९५ टक्के पाऊस झाला आहे, आणि गेल्या आठवड्यात १२५ मिमी पाऊस झाल्याचे नोंदवले गेले आहे. जून, जुलै व ऑगस्ट या तीन महिन्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. सोमवारी दिवसभर काही प्रमाणात पावसाने दिलासा दिला असला तरी मंगळवारी सकाळपासून कडक ऊन पसरले होते. बुधवारी पावसाची शक्यता कमी असली तरी गुरुवारी जिल्ह्यातील काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे.
३० आणि ३१ ऑगस्ट रोजी पावसापासून काही अंशी दिलासा मिळू शकतो, परंतु १ सप्टेंबरपासून जिल्ह्यात पुन्हा जोरदार पावसाची सुरुवात होणार आहे. पोळा सणादरम्यानही जोरदार पाऊस कायम राहण्याची शक्यता आहे.