बदलापूर येथील महिला पत्रकारास दिलेल्या अपमानास्पद वागणुकीचा निषेध; अमळनेर येथे तहसीलदारांना निवेदन




बदलापूर येथे लैंगिक अत्याचार प्रकरणाचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या महिला पत्रकारास माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी दिलेल्या अपमानास्पद वागणुकीचा अमळनेर मधील "व्हॉइस ऑफ मीडिया" संघटनेतर्फे तीव्र निषेध करण्यात आला. यासंदर्भात आज अमळनेर येथे तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात संबंधित घटनेची गंभीर दखल घेऊन आवश्यक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. "व्हाईस ऑफ मीडिया" संघटनेच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन सादर करण्यात आले, ज्यावर अनेक पत्रकारांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post