पुन्हा एकदा धरणाचं गाजर

         

निवडणूकीच्या तोंडावर विकास प्रकल्पाला मान्यता मिळाल्याची घोषणा करायची आणि मग ते प्रकल्प वर्षानुवर्षे तसेच अडकून ठेवायचे हे काय महाराष्ट्राच्या जनतेला नविन नाही. अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा विषय तर सर्वांनाच माहीत आहे. २०१९ साली ऐन निवडणूकीच्या तोंडावर मोदींच्या हस्ते उद्घाटन करुन अजून एकही वीट या प्रकल्पाची लावण्यात आलेली नाही. मागील पाच वर्षात नाही आणि एकदम ५० दिवसावर निवडणूका असताना परवानग्या मिळाल्याच्या बातम्या पेरुन मतदारांना भुलवण्याचा हा प्रयत्न किती यशस्वी ठरतो याचे उत्तर विधानसभा निकालांमध्येच दिसून येईल. 

मौजे प्र. डांगरी गावाला पुनर्वसनाचे आमिष

आपल्या गावाचे पुनर्वसन करु यासाठी मंत्री अनिल पाटिल यांचे कार्यकर्ते असलेले अनिल शिसोदे यांनी ग्रामसभा बोलवली. परंतु शिरीषदादा चौधरी गटाच्या कार्यकर्त्यांनी या कामासाठी थेट मुख्यमंत्र्याला पत्र देऊन स्वतः शिरीष चौधरी यांनी पाठपुरावा केल्याचे पुरावे तेथिल ग्रामसभेत सादर केले. यामुळे मंत्र्यांच्या कार्यकर्त्यांची चांगलीच पळताभुई झाल्याचे पहायला मिळाले. मा. आमदार शिरीष चौधरी यांनी पाठपुरावा केला म्हणून या गोष्टीला स्वतः मंत्र्यानी विरोध केल्याचे यावेळी त्यांनी सांगीतले. तसेच पाठपुरावा केलेल्या पत्राची झेरॉक्स सर्वांना दाखवली. संबंधित पत्रावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी मदत व पुनर्वसन मंत्रालयाच्या सचिवांना यावर त्वरीत कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.

हे देखील पहा :

कॅबीनेट मंत्र्यांच्या मतदारसंघात आरोग्य यंत्रणा अर्धमेल्या अवस्थेत


Post a Comment

Previous Post Next Post