विरोधी गटातील सामान्य कार्यकर्त्यांसाठी शिरीष चौधरींनी दाखवला मनाचा मोठेपणा : ८ वर्षांपूर्वीची केस घेतली मागे

              


     आज शनिवार दिनांक ३ ऑगस्ट रोजी मागील अनेक वर्षांपासून सूरु असलेल्या खटल्यात अमळनेरचे माजी आमदार शिरीष चौधरी यांनी आपल्या मनाचा मोठेपणा दाखवत विरोधी गटातील सामान्य कार्यकर्त्यांच्या विनंतीला मान दिला. २०१६ च्या एका प्रकरणात त्यांनी दिलेली फिर्याद मागे घेतली आज मागे घेतली आहे. 

काय होते प्रकरण?

     २०१६ मध्ये शिरीष चौधरी आणि अनिल पाटील समर्थकांमध्ये तुफान हाणामारी झाली होती. यानंतर आमदार शिरीष चौधरी यांनी त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या आणि यात सहभागी असणाऱ्या सर्वांविरोधात रीतसर तक्रार केली होती. यामध्ये स्वतः आताचे राज्याचे कॅबीनेट मंत्री देखिल सहभागी होते. दरम्यान नेत्यासाठी नाही तर समोरच्या असणाऱ्या गरीब घरच्या कार्यकर्त्यासाठी आपण ही फर्याद मागे घेत असल्याचे मा. आमदार शिरीष चौधरी यांनी माध्यमांशी बोलताना सांगीतले. 

     दरम्यान फिर्याद मागे घेतल्यावर माध्यमांशी संवाद साधताना मा. आमदार शिरीष चौधरी म्हणाले की, “नेत्यांमुळे सामान्य कार्यकर्त्याच नुकसान होतं. समोरच्या गटातील अनेक कार्यकर्ते माझ्याजवळ आले आणि मला विनंती केली की या केस मधून आम्हाला मुक्त करा. त्यांचा आणि त्यांच्या परिवाराचा विचार करुन हा खटला मी मागे घेतला आहे. माननीय न्यायालय यामधून त्यांची सुटका करतील अशी माझी अपेक्षा आहे. यातील मुख्य आरोपी हे अनिल पाटील, साहेबराव पाटील आणि शाम पाटील होते परंतु त्यांच्यामुळे इतरांना याचा त्रास होऊ नये यासाठी हा सकारात्मक निर्णय मी घेतला.” २०१६ मध्ये झालेल्या या भांडणाला शिरीष चौधरींच्या या पुढाकारामुळे पुर्णविराम लागल्याचे पहायला मिळत आहे.

हे ही वाचा : 

कॅबीनेट मंत्र्यांच्या मतदारसंघात आरोग्य यंत्रणा अर्धमेल्या अवस्थेत

Post a Comment

Previous Post Next Post