अमळनेर – संजय गांधी व श्रावण बाळ योजनेतील लाभार्थ्यांना आपले बँक खाते डिबीटी करणे अत्यावश्यक आहे, अन्यथा दरमहा मिळणारे वेतन थांबवले जाईल, असे आवाहन अमळनेरचे तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी केले आहे.
तहसील कार्यालयामार्फत यासंदर्भात सर्व लाभार्थ्यांना कळविण्यात आले असून, महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार जून २०२४ पासून दरमहा मिळणारे १५००/- रुपये थेट बँक खात्यात जमा केले जातील. त्यामुळे लाभार्थ्यांनी आपले आधार कार्ड, बँक खाते पासबुक, आणि अन्य आवश्यक कागदपत्रे तात्काळ आपल्या बँकेत जमा करून खाते डिबीटी करून घ्यावे. तसेच, कागदपत्रांची प्रत तहसील कार्यालयात व तलाठी कडे जमा करावी.
ज्या लाभार्थ्यांचे खाते अद्याप डिबीटी केलेले नाही, त्यांचे वेतन रोखले जाऊ शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.