मा. आ. शिरीष चौधरी आणि त्याचा कुटूंबावर हल्ला करणाऱ्या विरोधी गटाती कार्यकर्त्यांच्या आयुष्याचा आणि त्यांचा परिवाराचा विचार करून दिलदार वृत्तीने,मोठ्या मनाने माफ करून निर्दोष मुकत्तेचा मार्गे मोकळा केला आहे. अमळनेर विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर राजकीय चिखलफेकीला सुरवात झालेली असताना माजी आमदार शिरीष चौधरी यांनी घेतलेल्या या निर्णयाच सर्व स्तरातून स्वागत होत आहे.
काय होते प्रकरण?
२०१६ साली शिरीष चौधरी यांच्या घरावर अनिल पाटील, साहेबराव पाटील, श्याम पाटील यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसहीत लाठी-तलवारी, दगड फेक करून घरावर हल्ला केला होता. चौधरी कुटुंबातील महिलांना देखील यावेळी मारहाण करण्यात आली होती. त्यावेळी अनिल पाटील, साहेबराव पाटिल आणि त्यांचे सहकारी स्वतःची नगरपालिका निवडणुकीत हार दिसत असल्यामुळे ढोंगी पणा करून भांडण उकरून तत्कालीन आमदार शिरीष चौधरी यांच्यावर हल्ला करून गाडी तसेच घराची तोडफोड केली होती. आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी नेत्यांनी त्यांच्या सामान्य कार्यकर्त्यांच्या भविष्यासोबत खेळत त्यांची दिशाभूल केली होते. याविरोधात ज्यावेळी न्यायालयात खटला सुरु झाला त्यावेळी नेत्यांना त्याचा फारसा फरक पडला नाही," नेते तुपाशी आणि कारकर्ते उपाशी" या उक्तिप्रमाणे जवळपास ४० ते १०० कार्यकर्त्यांच्या आयुष्याची फरपड मागील ८ वर्षात झाल्याची पहायला मिळाली. यातून मार्ग काढण्यासाठी यापूर्वीही अनेकांनी मध्यस्थी केली परंतु विद्यमान आमदार अनिल पाटलांच्या हेकेखोर स्वभावामुळे यावर समाधान निघू शकले नाही. आता मात्र याच्यावर तोडगा काढण्यासाठी माजी आमदार शिरीष चौधरी यांनी कार्यकर्ते आणि त्यांच्या परिवाराचा सकारात्मक विचार करून समेटाची भुमिका घेतल्याचे समोर आले आहे.
शनिवारी कोर्टात काय झाालं?
मा. आमदार शिरीष चौधरी यांनी विरोधी पक्षातील सामान्य कार्यकर्त्यांच्या विनंतीला मान देऊन त्यांच्या परिवारासाठी आणि भविष्यासाठी कोर्टात आपली साक्ष फिरवली. ज्या कार्यकर्त्यांनी ८ वर्षांपुर्वी त्यांच्या घरात घुसून तलवारी उपसल्या होत्या, अगदी महिलांचा देखील विचार केला नव्हता, अशांसाठी आपल्या मनाचा मोठेपणा दाखवत, त्यांच्या परिवाराचा विचार करुन संबंधित भांडण मिटवण्यासाठी स्वतः माघार घेतली.
मागील ८ वर्षात काय घडलं?
कार्यकर्ते आणि जनतेची दिशाभूल करून साहेबराव पाटिल यांना नगरपालिकेत आणि अनिल पाटिल यांना आमदारकी मिळाली. याच भांडणाचा फायदा विद्यमान आमदार आणि मंत्री अनिल भाईदास पाटील यांना झाल्याचे म्हटले जाते. मात्र दुसरीकडे कोर्टाच्या फेऱ्या मारण्यात संबंधित ४० ते १०० कार्यकर्त्यांची भलतीच फरफट झाली. आर्थिक झड सोसावी लागली,यांना सरकारी नोकरीसाठी अडचणी आल्या, स्वतःची उर्जा वाया घालवावी लागली, या काळात त्यांच्या पाठीशी त्यांचे हेच नेत उभे राहिले नाही. "झाले काम आता व्हा लांब" अशी भुमिका नेत्यांनी घेतली. सामान्य कार्यकर्त्यांची होत असलेली पिळवणूक पाहून अनेकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला परंतु विद्यमान आमदारांचा इगो मध्ये येत असल्याने प्रकरण काही मिटले नाही. अशा परिस्थितीत यामध्ये होरपळलेल्या बहुतेकांनी माजी आमदार शिरीष चौधरी यांना भेटून या प्रकरणातून सुटका करण्याची विनंती त्यांना केली. एकेकाळी आपल्यावर तलवारी उपसणाऱ्या कार्यकर्त्यांच्या कुटंबाचा विचार करत मोठा दिलदार वृत्तीने शिरीषदादांनी ही केस मागे घेतली. स्वतः शक्तिमान असूनही फक्त सेवा हाच धर्म हे पुन्हा एकदा आपल्या कृतीतून सिद्ध केले.
हे ही वाचा