मनोज जरांगे-पाटील यांचा सत्ताधाऱ्यांना इशारा: ३० सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा


वडीगोद्री (जि. जालना): मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी शेतकऱ्यांची कर्जमुक्ती आणि पीक विमा वितरणाबाबत सत्ताधाऱ्यांना कडक इशारा दिला आहे. जर येत्या ३० सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळाली नाही, तर सर्वसामान्य शेतकरी सत्ताधारी पक्षाविरोधात मतदान करून त्यांच्या विरोधात आवाज उठवण्याचे काम करेल.


५ सप्टेंबरपासून घोंगडी बैठकीच्या रूपाने सर्व समाज एकत्र येणार असल्याचे त्यांनी सांगितले. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीला एक वर्ष पूर्ण झाले असताना, देवेंद्र फडणवीसांनी केसेस मागे घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अजूनही पोरांवरती केसेस सुरू असल्याची टीका मनोज जरांगे-पाटील यांनी केली.

Post a Comment

Previous Post Next Post