जळगाव जिल्ह्यात ३२५ होमगार्ड पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू: उमेदवारांची मोठी गर्दी


जळगाव: जळगाव जिल्ह्यात ३२५ होमगार्ड पदांसाठी भरती प्रक्रिया गुरुवारपासून सुरू झाली असून, ही प्रक्रिया ५ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. २९ ऑगस्ट रोजी २१०० उमेदवारांची चाचणी पार पडली, तर दररोज २८०० उमेदवारांची कागदपत्रांची पडताळणी, शारीरिक पात्रता, आणि क्षमता चाचणी घेण्यात येणार आहे. या प्रक्रियेत पुरुषांसाठी २१३ आणि महिलांसाठी ११३ जागा उपलब्ध आहेत.


उमेदवारांसाठी मैदानात सकाळी ६ ते १० या वेळेत प्रवेश देण्यात येत आहे. गोळाफेक आणि रनिंगसाठी ३० गुण देण्यात येत असून, पुरुषांसाठी १६०० मीटर व महिलांसाठी ८०० मीटर रनिंग आहे. होमगार्ड पदासाठी किमान दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, आणि आयटीआय प्रमाणपत्र धारकांना २ गुणांची विशेष भर दिली जात आहे.


होमगार्ड भरतीसाठी अटी: वयोमर्यादा, उंची, आणि कागदपत्रे

उमेदवारांचे वय २० ते ५० वर्षे असावे, आणि पुरुषांसाठी उंची १६२ सेंटीमीटर तर महिलांसाठी १५० सेंटीमीटर आवश्यक आहे. याशिवाय, मतदान ओळखपत्र, आधारकार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, खासगी नोकरी करणाऱ्यांसाठी ना-हरकत प्रमाणपत्र, आणि ३ महिन्यांतील पोलिस चारित्र्य प्रमाणपत्र यांची आवश्यक कागदपत्रे आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post