मुंबई: मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कोसळण्यामुळे राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आठ महिन्यांपूर्वी या पुतळ्याचे अनावरण झाले होते. या पुतळ्याच्या कोसळण्यावर पंतप्रधान मोदींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन माफी मागितली आहे.
पंतप्रधान मोदी सध्या मुंबई दौऱ्यावर असून, त्यांनी एका सार्वजनिक भाषणात राजकोट किल्ल्यावर घडलेल्या घटनेवर खेद व्यक्त केला. मोदी म्हणाले, “सिंधूदुर्गातील घटना वाईट आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहेत. त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन माफी मागतो. शिवप्रेमींना झालेल्या वेदना स्वीकारतो आणि त्यांच्या भावना मान्य करतो.”
या घटनेनंतर काँग्रेसने भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जोरदार आंदोलन केले होते. पंतप्रधान मोदींच्या भाषणात त्यांनी शिवप्रेमींना दिलासा देत, पुतळा कोसळण्याच्या घटनेची जवाबदारी स्वीकारली आहे.