अजित दादा गटातून अनिल पाटलांना विरोध : पदाधिकाऱ्यांचे राजीनामा सत्र सुरु

                    


अनिल पाटील यांच्याकडे मंत्रीपद असुनही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना त्याचा कसलाही फायदा होत नसून कुठलीही विकासकामे त्यांच्या माध्यमातून मिळत नाहीत. असा आरोप धरणगावचे पक्षाचे तालुकाध्यक्ष शामकांत पाटील यांनी केला. सोबतच रमेश पाटील आणि राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस निंबाजीराव पाटील यांनीही अनिल पाटील यांच्यावर गंभीर आरोप करत स्वतःच्या पदाचा राजीनामा पक्षाकडे दिला सादर केला. 

या मागून आलेल्या नेत्याला जिल्हातील कार्यकर्ते समोर उभा केले तर नावे सुद्धा सांगता येणार नाही. अशी टिकेची झोड व्हाट्सअप मॅसेज द्वारे संबंधित पदाधिकाऱ्यांनी अनिल पाटील यांच्यावर उठवली आहे. सोबतच त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीवर ताशेरे ओढत, अजित दादांची कार्यशैली आणि हव तर जिल्याच्या पालकमंत्र्यांकडून काहीतरी यांच्याकडून काहीतरी शिका अशी वल्गला देखील या संदेशातून करण्यात येत आहे. 

अनिल पाटलांना मतदारसंघानंतर आता जिल्ह्यातूनही स्वजनांचा विरोध

स्वतःकडे कॅबीनेट मंत्रीपद असुन स्वतःच्या मदतारसंघाला त्यातून चांगला निधी आणू न शकल्याची टिका कॅबीनेट मंत्र्यावर होत असताना आता जिल्हाच्या राजकारणात देखील त्यांच्या नाकर्तेपणावर त्यांच्याच पक्षातील पदाधिकाऱ्यांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. 

Post a Comment

Previous Post Next Post