प्रवचनात प्रेषित महंमद पैगंबर यांचेविषयी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी गंगागिरी संस्थान गोदावरी धाम बेटाचे मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांच्यावर महाराष्ट्रातील विविध भागात रामगिरी महाराजांच्या वर कारवाई करण्याची मागणी मुस्लिम बांधवानी केली होती.
या प्रकरणी नाशिकच्या येवला शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महंत रामगिरी यांच्या प्रवचनाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हायरल व्हिडीओमध्ये आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा मुस्लिम समाजाने आरोप केला आहे. या वक्तव्यामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्याने नाशिकच्या येवला आणि मनमाड शहरात काल मध्यरात्री त्याचे पडसाद उमटले होते. तसेच अहिल्यानगर, संभाजीनगर व महाराष्ट्रातील विविध भागात तीव्र पडसाद उमटले होते.
महंत रामगिरी यांचा सिन्नर येथे नारळी सप्ताह सुरू असतांना महंत रामगिरी यांच्यावर येवला शहर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सोबतच महाराष्ट्रातील विविध भागातील पोलीस स्टेशन मध्ये त्यांच्या वर आक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत.