अमळनेर च्या जनतेला लोकप्रतिनिधी मूर्ख समजत आहेत का ?
विधानसभा निवडणूक जस जशी जवळ येत आहे तसं अमळनेर विधानसभा मतदारसंघात राजकीय तापमान वाढत आहे. अमळनेर शहरात मंत्री अनिल पाटील यांच्याकडून खा. सुप्रिया सुळे ह्या अमळनेर दौऱ्यावर आले असता त्यांनी काही बॅनर अमळनेर शहरात लावले होते त्या बॅनर मध्ये मतदार संघातील कामाचे श्रेय त्यांना घ्यायचे आहे असे दाखवायचे होते परंतु त्यांच्या या कृत्यावरून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रा. अशोक पवार यांनी समाचार घेतला आहे.
शहरातील मुख्य रस्त्यावर बॅनर मध्ये असा मजकूर आहे ..
अमळनेरची जनता सुज्ञ आहे. कारण त्यांना माहीत आहे...
1. निम्न तापी पाडळसरे धरणाला ४८९० कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता कोणामुळे मिळाली?
2. केंद्रीय जल आयोगाचा INVESTMENT CLEARANCE चा मार्ग कोणामुळे मोकळा झाला?
3. केंद्रीय वन विभागाची अंतिम मंजुरी कोणामुळे मिळाली? 4.पाडळसरे धरणाच्या आड येणाऱ्या ९०% अडचणी कोणामुळे सुटल्या? 5. पाडळसरे धरणाला राज्य सरकारकडून सगळ्यात जास्त 508 कोटींचा निधी कोणी आणला?
त्यामुळे आता अमळनेरची जनताच ठरवेल कोणाला आमदार करायचं....
या बॅनर वरील मजकुराला प्रतिउत्तर देत प्रा. अशोक पवार यांनी मंत्रीमहोदयांचा समाचार घेतला ..
निम्न तापी पाडळसे धरणाला ४८९० कोटीची सुधारित प्रशासकीय मान्यता कोणामुळे मिळाली यावर प्रा. पवार यांचे उत्तर असे कीं सुज्ञ जनता पाडळसे धरणाची किंमत बदलली की सुधारित प्रशासकीय मान्यता घ्यावी लागते. आतापर्यंत ही तिसरी प्रशासकीय मान्यता आहे. असे ही सत्ताधार्यांना समजू नये हें दुर्दैव आहे.
तर 26 वर्षात धरण पूर्ण न झाल्याने 142 कोटी किमतीचे धरण 4890 कोटी ला गेले याची थोडीफार तरी लाज येथील लोकप्रतिनिधीनां का वाटत नाही?
धरणाच्या वाढीव किमतीला मंजुरी घेणे हा काही तुमचा पराक्रम नाही. अजून धरणाची किंमत बदलेल आणि पुढे पुन्हा सुधारित प्रशासकीय मान्यता घ्यावी लागेल. तर केंद्रीय जल आयोगाची Investment Clearance चा मार्ग कोणामुळे मोकळा झाला. असे म्हणणारे तुम्ही अमळनेर चीं सुज्ञ जनता सुज्ञ आहे आणि तुम्हाला तुमची जागा निश्चितचं दाखवेल यात शंका नाही. केंद्रीय जल आयोगाची ही दुसऱ्यांदा मान्यता आहे . हे काम ताप महामंडळाचे व जलसंपदा सचीवांचे हे प्रशासकीय काम आहे. या कार्यालयीन तांत्रिक बाबी आहेत. यात मिरवण्या सारखे काही नाही.
केंद्रीय वन विभागाची मंजुरी कोणामुळे मिळाली म्हणजे तुम्ही अमळनेर च्यां जनतेवर उपकार केलेत का ?? तुमचे काही कर्तव्य नाही का ? सुज्ञ जनता केंद्रीय वन विभागाची मंजुरी घ्यायला पाच वर्षे लागतात का अशा वल्गणा मतदार संघातील लोक करू लागले आहेत ही शरमेची गोष्ट आहे. हे प्रशासकीय काम आहे आपली स्वतःची पाट थोपटून घेण्याची आवश्यकता काय.
अमळनेर ची जनता सुज्ञ आहे लोकप्रतिनिधी त्यांना मूर्ख बनवू शकणार नाहीत.
पाडळसे धरणाच्या आड येणाऱ्या अडचणी कोणामुळे सुटल्या. असे जर तुम्ही म्हणत असाल तर अडचणी प्रशासनामुळे तात्पुरत्या सुटल्या, पण पुन्हा या अडचणी निर्माण होणारचं आहेत. पाडळसे धरणाला राज्य सरकारकडून सगळ्यात जास्त 508 कोटीचा निधी कोणी आणला हें सांगणाऱ्यानो जनता सुज्ञ आहे. जनतेला हें ही सांगा पाडळसे धरण राज्य सरकारच्या निधीतून कधीही होणार नाही. तज्ञ अधिकाऱ्यांच्या मते दरवर्षी 500 कोटी धरणासाठी मिळाले तरच धरण दहा पंधरा वर्षात पूर्ण होऊ शकते. दरवर्षी पाचशे कोटी किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम केंद्र सरकारच देऊ शकते. पाच वर्षात 500 कोटी मिळाले तर धरण अजून पंचवीस वर्षे होणार नाही. पाडळसे धरण पंतप्रधान सिंचन योजनेत समाविष्ट करण्यासाठी तुम्ही अपयशी ठरले आहेत हे ही सुज्ञ जाणून आहे. जनता सुज्ञ आहे. पाडळसे धारण पूर्ण न होण्यामागे हें तुमचे अपयश आहे. प्रा. अशोक पवार यांनी या प्रकारे मंत्रीमहोदयांचा समाचार घेतला