अमळनेरचे शेतकरी संकटात: मंत्र्यांचे दुर्लक्ष,शेतकऱ्यांना मदतीचा पत्ता नाही!


अमळनेर तालुक्यातील शेतकरी ओल्या दुष्काळामुळे गंभीर अडचणीत सापडले आहेत. पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाले आहेत, पण शासनाकडून अजूनही कोणतीही ठोस मदत मिळालेली नाही. विशेष म्हणजे, शेजारच्या तालुक्यांना मागील दुष्काळ अनुदान मिळाले असताना, अमळनेर तालुका मात्र या मदतीपासून वंचित राहिला होता. 

दोन वर्षांपूर्वीच्या अतिवृष्टीचे ५४ कोटी रुपये अजूनही पुनर्वसन खात्यात पडलेले आहेत, परंतु शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळालेला नाही. शेतकऱ्यांचा आरोप आहे की, *"पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या दुर्लक्षामुळे अमळनेर तालुक्याचे १५० ते २०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे."* ओल्या दुष्काळाची गंभीरता लक्षात घेऊन, शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, अशी मागणी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून केली जात आहे. *"राजकारणात मालामाल होणारे मंत्री आणि बेहाल होणारे शेतकरी, हेच आजच्या वास्तवाचे विदारक चित्र आहे,"* असे रोखठोक शब्दात शेतकऱ्यांनी सांगितले. 


या समस्येबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी विडिओ पाहा!



Post a Comment

Previous Post Next Post