अमळनेर शहरातील धुळे रोड, तहसील कार्यालयासह प्रमुख रस्त्यांवर मोकाट जनावरांनी अक्षरशः रस्ते अडवले आहेत. यामुळे वाहनधारकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असून, अपघातांची शक्यता वाढली आहे. विशेषतः महिलांमध्ये आणि शालेय विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सध्या नगरपालिकेकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. नगरपालिकेने तातडीने उपाययोजना करून जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. तुषार नेरकर, मुख्याधिकारी, नगरपालिका, अमळनेर यांनी संबंधित विभागाला मोकाट जनावरांच्या मालकांना तातडीने नोटिसा देण्याचे आदेश दिले आहेत.
Tags,recent
अमळनेर शहर