नेपाळमधील काठमांडूजवळ भीषण बस अपघातात जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील २३- २५ भाविकांचा मृत्यू झाला आहे, तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. पशुपतिनाथ दर्शनावरून परतणाऱ्या भाविकांच्या बसचा चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस ५०० फुटांवरून नदीत कोसळली. पावसामुळे मदतकार्यात अडथळे येत असून, नेपाळ लष्कराच्या हेलिकॉप्टरच्या मदतीने जखमींना काठमांडूला हलवण्यात आले आहे. राज्य सरकारने मृतदेह व जखमींना मूळगावी आणण्यासाठी मदतकार्य सुरू केले आहे.
नेपाळ बस अपघात : भुसावळच्या भाविकांचा मृत्यू, ५०० फुटांवरून कोसळली बस, अनेकजण जखमी
byJagrutipatra
-
0