शाळांमध्ये सीसीटीव्ही नसेल तर मान्यता रद्द होणार – जिल्हाधिकाऱ्यांचा अल्टिमेटम


बदलापूर शाळेतील घटनेनंतर जळगाव जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थी सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी, येत्या महिनाभरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले नाहीत तर त्या शाळांची मान्यता रद्द केली जाईल, असा कडक इशारा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिला. जिल्ह्यातील ३३७४ शाळांपैकी फक्त १८० शाळांमध्ये सीसीटीव्ही आहेत, उर्वरित २३९४ शाळांमध्ये मात्र अद्यापही सीसीटीव्ही बसवलेले नाहीत, त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्यात असल्याची माहिती समोर आली आहे.

जळगावात १४० शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत 

जळगाव शहरात २१० शाळा असून यातील ७० शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविलेले आहेत. मात्र, १४० शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसविले नाहीत. मात्र, सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी मंजूरी मिळाली असल्याची माहिती मनपा प्रशासकीय अधिकारी दिपाली पाटील यांनी सांगीतले.

Post a Comment

Previous Post Next Post