अमळनेर: आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यस्तरीय शासकीय संघटनांनी पुकारलेल्या संपामध्ये अमळनेर नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी ठाम भूमिका घेतली आहे. 29 ऑगस्टपासून सुरू झालेल्या या संपात अन्य संघटनांनी सहभाग स्थगित केला असला तरी, नगर परिषद संवर्ग कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी काम बंद आंदोलन सुरू ठेवले आहे.
यावेळी सर्व संवर्ग कर्मचाऱ्यांनी न. प. कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करून जोरदार निदर्शने केली. त्यांनी मुख्याधिकारी तुषार नेरकर यांना निवेदन सादर केले, ज्यात 2005 साली लागू झालेल्या डिसीपीएस पेन्शन योजना आणि एनपीएस पेन्शन योजना अद्याप लागू न झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. या आंदोलनात उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड, विद्युत अभियंता प्रशांत ठाकूर, नगर अभियंता अमोल भामरे, आस्थापना प्रमुख नेहा पाटील यांसह अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.