महायुतीची १२ जागांची वाटणी: भाजप, शिंदे सेना आणि अजित पवार गटाने ठरवला ६-३-३ फॉर्म्युला


मुंबई: विधान परिषदेच्या १२ राज्यपाल नियुक्त जागा भरण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ज्येष्ठ नेते खा. प्रफुल्ल पटेल यांच्यात गुरुवारी रात्री खलबते झाले. या बैठकीत भाजपला सहा, शिंदे सेनेला तीन, आणि अजित पवार गटाला तीन जागा मिळणार, असा ६-३-३ फॉर्म्युला ठरविण्यात आला आहे.


वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीत या नावांची अंतिमकरणाची प्रक्रिया निश्चित करण्यात आली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत लवकरच या नावांना मान्यता देऊन राज्यपालांकडे पाठवली जाणार, असे सूत्रांनी दिली आहे. १२ जागांचे प्रकरण न्यायालयात असून, १ सप्टेंबर रोजी अंतिम निकाल येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रक्रियेला वेग आला आहे.


उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या महिन्यात पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना राज्यपाल नियुक्त आमदारांची नियुक्ती ३० ऑगस्टपूर्वी केली जाईल, असे सांगितले होते. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकार या १२ जागा भरण्याचा प्रयत्न करत आहे, ज्यामुळे विधान परिषदेत महायुतीचे संख्याबळ वाढणार आहे.


सध्या विधान परिषदेत ७८ सदस्य असून, २७ जागा रिक्त आहेत, ज्यात राज्यपाल नियुक्त आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधून येणाऱ्या जागांचा समावेश आहे. महायुतीला समर्थन देणाऱ्या अपक्षांसह सध्या ३४ सदस्य आहेत, तर महाविकास आघाडीच्या १७ सदस्य आहेत. १२ सदस्यांच्या नियुक्तीनंतरही १५ जागा रिक्त राहणार आहेत.


भाजपकडून या १२ जागांच्या नावांची चर्चा 

माजी आमदार सुधाकर कोहळे, राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर, महिला आघाडीच्या अध्यक्ष चित्रा वाघ, अध्यात्मिक आघाडीचे अतुल भोसले, नाशिकचे बाळासाहेब सानप, आणि हर्षवर्धन पाटील यांच्यावर होणार आहे. जातीय समीकरणे आणि बहुजन समाजाच्या चेहऱ्यांना अधिक संधी देण्याच्या दृष्टिकोनातून या १२ नावे निश्चित केली जातील, असे सांगितले जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post