रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी युक्रेनशी सुरू असलेला दीर्घकालीन संघर्ष मिटवण्यासाठी भारत, चीन आणि ब्राझील या देशांशी सातत्याने संपर्कात असल्याचे जाहीर केले आहे. रशिया-युक्रेन युद्धावर तोडगा काढण्यासाठी हे तिन्ही देश प्रामाणिक प्रयत्न करत असल्याचे पुतिन यांनी इस्टर्न इकॉनॉमिक फोरमच्या अधिवेशनात म्हटले. त्यांच्या या वक्तव्यामुळे फेब्रुवारी २०२२ पासून सुरू असलेल्या युद्धावर शांतीचे संकेत मिळत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेनच्या राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्याशी अलीकडेच केलेल्या चर्चेनंतर, पुतिन यांनी भारताच्या सहभागाचे विशेषत्व नमूद केले आहे. पुतिन यांच्या मते, चीन, ब्राझील आणि भारत यांच्या प्रामाणिक इच्छेमुळे या संघर्षावर तोडगा निघू शकतो.
रशियाचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनीही भारताच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर जोर दिला असून, पंतप्रधान मोदी आणि पुतिन यांच्या विश्वासाच्या नात्यामुळे चर्चेचा मार्ग भारत खुला करू शकतो, असे ते म्हणाले.