अफवांवर विश्वास ठेऊ नका, अपक्ष म्हणूनच लढणार – मा. आ. शिरीषदादा चौधरी


अमळनेरचे माजी आमदार शिरीष चौधरी यांनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. "जनता जनार्दन हाच माझा पक्ष, त्याचा आशीर्वाद हेच माझे बळ," अशी प्रतिक्रिया देत त्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन केले आहे. चौधरी यांचे निकटवर्तीय आणि मित्र परिवाराने या निवडणुकीत अपक्ष उभे राहण्याचा निर्णय घेतला असून, शिरीषदादा यांनी जनता जनार्दनाच्या ताकदीवर निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे स्पष्ट केले.


शिरीष चौधरी हे २०१४ मध्ये अपक्ष आमदार म्हणून विजयी झाले होते. मात्र, २०१९ मध्ये त्यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती, परंतु त्यावेळी त्यांचा पराभव झाला होता. यंदा, पुन्हा एकदा अपक्ष लढण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला असून, कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post