कापूस उत्पादकांना यंदा वाईट दिवस; फुलपाती गळती, लाल्या रोग आणि बोंड कुजण्यामुळे उत्पादनात घट


खरीप हंगामात कापूस उत्पादकांना यंदा अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. फुलपाती गळती, कैऱ्या सडणे, आणि कापसावर लाल्या रोगाचा आक्रमण यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सुताच्या कमी मागणीमुळे कापसाच्या गाठींचे भाव घसरले आहेत, तर निर्यात कमी झाल्याने बाजारात कापसाचे भाव कमी झाले आहेत.


सततच्या पावसामुळे कापसाच्या गाठींच्या फुलपाती गळून पडत आहेत, आणि ढगाळ वातावरणामुळे कैऱ्या सडून जात आहेत. त्यामुळे उत्पन्नात घट होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी मोठा खर्च करून देखील त्यांना कमी भाव मिळाल्यामुळे त्यांची निराशा वाढली आहे. मागील वर्षी कापसाच्या पिकाला कमी भाव मिळाला होता आणि यंदा तर परिस्थिती अधिक वाईट आहे.


कापसाच्या हमीभावाची मागणी जोर धरत आहे.  शेतकरी शासनाला प्रति क्विंटल १०,००० रुपये हमीभाव देण्याची मागणी करत आहेत. पावसामुळे कापसाचे उत्पादन कमी झाल्याने शासकीय खरेदी केंद्रे वाढवावी अशीही अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


आंतरराष्ट्रीय बाजारात सुताच्या कमी मागणीमुळे कापसाचे भाव वाढण्याची आशा कमी आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले की, कापसाच्या उत्पादनात मोठी घट झाली असून, कापसाला १०,००० रुपये प्रति क्विंटल शासनाने भाव द्यावा

Post a Comment

Previous Post Next Post