चेस ऑलिम्पियाड २०२४: भारताची सुवर्ण कामगिरी! पुरुष आणि महिला संघाने जिंकले सुवर्णपदक




भारताने बुद्धिबळाच्या जागतिक पातळीवर इतिहास घडवला आहे. ४५ व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड २०२४ स्पर्धेत भारताच्या पुरुष आणि महिला संघांनी दमदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. या स्पर्धेत भारताचा प्रमुख खेळाडू डी. गुकेशने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे.


पुरुष संघाने १०व्या फेरीत अमेरिकेचा २.५ - १.५ असा पराभव करत सुवर्णपदक जिंकले. डी. गुकेशने अमेरिकेच्या फॅबियानो कारूआना याला पराभूत केले. संपूर्ण स्पर्धेत गुकेशने ८ सामने जिंकले आणि २ सामने ड्रॉ केले, त्यामुळे त्याच्या खेळाचे सर्वत्र कौतुक होत आहे. गुकेशसह भारतीय संघात आर प्रज्ञानंद, अर्जुन इरीगसी, विदित गुजराथी, पेंटाला हरिकृष्ण आणि श्रीनाथ नारायणन या खेळाडूंचा समावेश आहे. त्यांच्या उत्कृष्ट खेळामुळे भारताने बुद्धिबळ ऑलिम्पियाड २०२४ मध्ये इतिहास रचला आहे.


महिला संघानेही याच स्पर्धेत आपली गुणवत्ता सिद्ध करत सुवर्णपदक पटकावले. वंतिका अगरवाल, दिव्या देशमुख, हरिका द्रौनोवल्ली, वैशाली रमेशबाबू, आणि तानिया सचदेव या महिला खेळाडूंच्या चमकदार कामगिरीमुळे भारताने महिला गटातही सुवर्णपदक जिंकले आहे.


दोन्ही संघांनी मिळवलेल्या या ऐतिहासिक विजयामुळे भारताचे बुद्धिबळ क्षेत्रातील वर्चस्व आणखी वृद्धिंगत झाले आहे, आणि भारताने आंतरराष्ट्रीय बुद्धिबळात आपली महत्त्वपूर्ण छाप उमटवली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post