फरार आरोपी महेंद्र बोरसेवर मंत्री अनिल पाटील यांचा वरदहस्त आहे का ?

अमळनेर - रेशन माफिया महेंद्र बोरसे आणि त्याचा भाऊ विनोद बोरसे यांनी नियोजित कटकारस्थान करून सुरेश पाटील यांचा मुलगा गोपाल पाटीलवर चाकूहल्ला केल्याचा गंभीर आरोप सुरेश पाटलांनी पत्रकार परिषदेत केला आहे. या प्रकरणात महेंद्र बोरसे 17 तारखेपासून फरार आहे, तर विनोद बोरसे 3 तारखेपासून फरार असल्याचे सांगितले जात आहे. 


सुरेश पाटील यांनी म्हटले की, "माझ्या मुलावर झालेला चाकूहल्ला हा पूर्णपणे नियोजित कट होता. महेंद्र आणि विनोद बोरसे यांनी या कटात सहभागी होऊन माझ्या मुलाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला." या प्रकरणात अजून दोन संशयित आरोपींची चौकशी सुरु आहे, परंतु मुख्य आरोपी अजूनही पोलिसांच्या हातावर तुरी देत आहेत.


महेंद्र बोरसे हा माजी सरपंच असून जिल्ह्यात एक स्वयंघोषित नेता म्हणून काम करत आहे. असे बोलले जात आहे की, महेंद्र बोरसे हा मंत्री अनिल पाटील यांचा माणूस असल्यामुळेच तो इतके दिवस फरार असून, त्याच्यावर पोलीस कारवाई करण्यात अडथळे येत आहेत का? या प्रकरणात मंत्री पाटील यांचा वरदहस्त असल्याच्या चर्चा तालुक्यात होत आहेत.


जळगाव पोलिसांनी या प्रकरणात काही आरोपींना ताब्यात घेतले असले तरी मुख्य आरोपी अद्याप फरार असल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. मंत्री अनिल पाटील यांचा या प्रकरणात नेमका काय संबंध आहे आणि फरार आरोपींच्या अटकेसाठी पोलीस काय उपाययोजना करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post