मंत्री अनिल पाटील यांच्यावर राजपूत समाजाचा रोष




अमळनेर: २० सप्टेंबर २०२४ रोजी अमळनेर पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्यात अनिल भाईदास पाटील यांनी घेतलेल्या कार्यक्रमाचे ठिकाण "ॲक्सिस बँकेसमोर" असे उल्लेखित केल्याने स्थानिक राजपूत समाजात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, हा परिसर वास्तवात महाराणा प्रताप चौक म्हणून प्रचलित आहे,आणि प्रत्येक फलक किंव्हा विविध राजकीय, सामाजिक कार्येक्रमाचे ठिकाण म्हणून 'वीरशिरोमणी महाराणा प्रताप चौक' असाच उल्लेख असतो तरीही मंत्री महोदयांनी वेगळा उल्लेख करतात त्यामुळे मंत्री महोदय आपण मदत करत नाही किंवा केली नाही म्हणून असा समज असल्यामुळे मंत्री अनिल पाटील यांच्यावर द्वेषभावनेचा आरोप केला जात आहे.

एवढेच नव्हे तर हा समाज शेतकरी आणि कष्ट करणारा असून बऱ्याच वर्षापासून समाजासाठी आर्थिक महामंडळ स्थापन व्हावे अशी त्याचे स्वप्न होते त्यासाठी सर्व राज्य भरातून त्यासाठी लढा उभारण्यात आला होता त्याचाच भाग म्हणून जळगाव जिल्ह्यातील राजपूत समाजाच्यावतीने काही वरिष्ठ प्रतिनिधींनी जिल्ह्यातील सर्व मंत्री, लोकप्रतिनिधी, सामाजिक, राजकीय नेते यांनी शिफारस द्यावी अशी विनंती केली होती त्या अनुषंगाने मंत्री पाटील यांच्याकडे देखील वीरशिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यासाठी शिफारस पत्र देण्यासाठी विनंती केली होती परंतु जिल्ह्यातील सर्व नेत्यांनी शिफारस पत्र दिले असताना देखील मंत्री महोदयांनी त्या संदर्भातील पत्र देण्यास टाळाटाळ केली असा समाजाचं आरोप आहे.

तथापि, राजपूत समाजाच्या या लढ्याला यश प्राप्त झाले असून शासनाने वीरशिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळाला मंजुरी दिली असून, हे समाजाच्या दृष्टीने एक सकारात्मक पाऊल आहे. यात मंत्री अनिल पाटील यांनी कुठेलेही सहकार्य केलेले नाही नसून समाजात त्यांच्याबाबत चांगलीच नाराजी पसरली आहे. राजपूत समाजाने मंत्र्यांविरोधात स्पष्ट जाहीर निषेध व्यक्त केला असून, आगामी निवडणुकांमध्ये याची चांगलीच किंमत मंत्र्यांना चुकवावी लागेल, असे बोलले जात आहे.

राजपूत समाजाच्या या रोषामुळे मंत्री श्री. अनिल पाटील यांच्या प्रतिमेला मोठा धक्का लागण्याची शक्यता आहे.





Post a Comment

Previous Post Next Post