अमळनेर प्रताप महाविद्यालयात कायद्यांवर जनजागृती कार्यक्रम: महिलांवरील अत्याचार आणि रॅगिंगविरोधी नियमांची माहिती


अमळनेर : प्रताप महाविद्यालयाच्या अँटी रॅगिंग आणि लैंगिक छळ समिती तसेच तालुका विधी सेवा समिती आणि वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांवरील अत्याचार आणि रॅगिंगविरोधी जनजागृती उपक्रम राबविण्यात आला.  


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अरुण जैन होते. व्यासपीठावर अँड. अविनाश खैरनार, किशोर पाटील, उपाध्यक्षा माधुरी पाटील, सुनील पाटील, डॉ. धीरज वैष्णव, डॉ. वंदना भामरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.  


अँड . राजेंद्र निकम यांनी बालकांचे लैंगिक गुन्ह्यापासून संरक्षण कायद्याची माहिती दिली, तर अँड. यज्ञेश्वर पाटील यांनी कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळविरोधी कायदा समजावून सांगितला. अँड. जगदीश बडगुजर यांनी रॅगिंगविरोधी कायदा आणि वाहतुकीचे नियम स्पष्ट केले.  


सूत्रसंचालन प्रा. डॉ. कल्पना पाटील यांनी केले तर आभारप्रदर्शन डॉ. नलिनी पाटील यांनी केले. या कार्यक्रमास विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शिक्षक व कर्मचाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले.

Post a Comment

Previous Post Next Post