गुरुवारपर्यंत दमदार पावसाचा अंदाज असून, २९ सप्टेंबरनंतर जिल्ह्यात पावसाची शक्यता कमी आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ७०९ मिमी पाऊस झाला असून, हा एकूण सरासरीचा ११५ टक्के आहे. यामुळे जिल्ह्यातील जलसाठेही समाधानकारक आहेत.
ऑक्टोबरमध्ये उष्णतेचा अंदाज
३० सप्टेंबरनंतर पावसाची विश्रांती घेतली जाईल, परंतु ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत तापमानात वाढ होऊन पारा ३८ अंशांवर जाण्याची शक्यता आहे. वातावरणात आर्द्रतेमुळे उकाडा जाणवणार असून, १५ ते २० ऑक्टोबरदरम्यान थंडीचा प्रारंभ होईल.