बारामती (जि. पुणे): राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या (मविआ) जागावाटपाबाबत महत्वपूर्ण वक्तव्य केले आहे. पवार म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस या तीन पक्षांचा एकत्रित निर्णय महत्त्वाचा आहे आणि या तीन पक्षांमध्ये एकवाक्यतेने जागावाटपाचा निर्णय घेतला जाईल. येत्या ८ ते १० दिवसांत महाविकास आघाडीची बैठक घेऊन जागावाटपाची प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल.
आगामी विधानसभा निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांची तपासणी सुरू असल्याचे पवार यांनी सांगितले. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि वरिष्ठ नेत्यांची टीम मुलाखती घेऊन उमेदवारांची निवड करेल.
मराठा आणि धनगर आरक्षणाबाबत बोलताना पवार यांनी सांगितले की, असे मुद्दे सामंजस्याने सोडवावे लागतात. जात आणि धर्म काहीही असले तरी आपण सर्व भारतीय आहोत, यावर पवारांनी जोर दिला. राज्य सरकारने नागरिकांना विश्वासात घेऊन योग्य तो निर्णय घेतला पाहिजे आणि वातावरण शांत ठेवण्यासाठी खबरदारी घ्यावी, असेही त्यांनी नमूद केले.
हे ही वाचा
अमळनेरमध्ये उमेदवार बदलण्याची शक्यता: राष्ट्रवादीच्या सर्वेत अनिल पाटील यांच्याबद्दल जनतेत नाराजी