अमळनेर - बोरी नदीवरील बंधाऱ्याला पहिल्याच पावसात भगदाड पडल्यामुळे संपूर्ण पाणी वाहून जात आहे. हे बंधारे मंत्री अनिल पाटील यांच्या कार्यकाळात बांधण्यात आले होते, असे निकृष्ट दर्जाचे काम झाल्याने जनतेचा निधी वाया जात आहे अशी भावना जनसामान्यांच्या मनात आहे.
या घटनेमुळे मंत्री अनिल पाटील यांच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे की, त्यांनी या कामासाठी किती टक्केवारी घेतली? ठेकेदाराकडून पैसे खिशात घालण्याच्या लालसेनेच या बंधाऱ्याचे निकृष्ट बांधकाम झाले का? जनतेच्या हितासाठी असलेला निधी गैरमार्गाने वापरून असा भ्रष्टाचार करणाऱ्या मंत्र्यांचा या दुर्घटनेला संपूर्ण जबाबदार धरले जात आहे.
शेतकरी आणि नागरिकांनी या घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, मंत्री पाटील यांच्या निष्काळजीपणामुळे हा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. निकृष्ट कामामुळे सध्याच्या आणि भविष्यातील सिंचन प्रकल्पांवर परिणाम होईल, हे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे मंत्री पाटील यांनी ठेकेदारांवर काय कारवाई करणार? तसेच, आपल्या कार्यकाळातील इतर निकृष्ट कामांचा अहवाल जनतेसमोर आणणार का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
अमळनेरचे लोकप्रतिनिधी म्हणून, मंत्री पाटील यांनी या समस्येला कसे तोंड देणार, आणि जनतेला कोणते समाधान देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.