अमळनेर शहरात गुन्हेगारीने उचल खाल्ली आहे, आणि यामागे मंत्री अनिल पाटील यांचा हात आहे का, असा गंभीर प्रश्न शहरातील नागरिकांना पडला आहे. गुंडगिरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे, आणि बेकायदा पत्त्याचे क्लब, सट्टा, दारू, तसेच अवैध धंदे शहरात बिनधास्तपणे सुरू आहेत. हे सर्व पोलिसांच्या हप्त्यामुळे होतंय का, की अनिल पाटील यांच्या पाठिंब्यामुळे हे प्रकार चालू राहिले आहेत?
पोलिसांना हप्ते मिळत असल्याने गुन्हेगारांचं धाडस वाढलंय, हे सत्य आहे का? मंत्री अनिल पाटीलच या गुन्हेगारी नेटवर्कला अप्रत्यक्षपणे समर्थन देत आहेत का, असा संशय आता सर्वसामान्य जनतेला येऊ लागलाय.
या अवैध धंद्यांमुळे तरुण पिढीचा भविष्य अंधारात ढकलला जात आहे. रोज चाकू हल्ले, गावठी पिस्तुलाने गोळीबार अशा घटनांनी शहराच्या सुरक्षिततेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण केला आहे. हे सर्व चालूनही मंत्री अनिल पाटील गप्प का आहेत? ते या गुन्हेगारीला पाठबळ देत आहेत का?
गुन्हेगारी आणि दोन नंबरचे धंदे सुरूच राहिल्यास, नागरिकांनी उपोषणाचा इशारा दिला आहे. मात्र, या इशाऱ्यावर मंत्री अनिल पाटील आणि प्रशासन काय पाऊल उचलणार? ते या गोष्टींचा अंत करतील, की गुन्हेगारांना वाचवण्याचा प्रयत्न करतील?