पातोंडा ग्रामपंचायतीसमोर साचले पाण्याचे डबके; ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी


अमळनेर: पातोंडा ग्रामपंचायतीच्या समोरच्या मठगव्हाण रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी साचून रस्त्याचे तलावासारखे स्वरूप झाले आहे. या डबक्यांमुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांना अत्यंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत असलेल्या या रस्त्याचे काही महिन्यांपूर्वी काँक्रीटीकरण झाले होते, मात्र महावितरण केंद्रापासून ते पोलीस स्टेशनपर्यंतचे काम अधुरे राहिल्याने खड्डे निर्माण झाले आहेत. पावसाचे पाणी या खड्ड्यांत साचून मोठी डबकी तयार झाली आहेत.


ग्रामपंचायत आणि सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. पेव्हर ब्लॉक बसविल्याने रस्ता अधिक खोल गेल्यामुळे पाणी रस्त्यावर साचत आहे, आणि त्यामुळे रस्त्याने चालणे किंवा वाहन चालवणे अत्यंत कठीण झाले आहे. ग्रामपंचायतीने या समस्येवर तातडीने उपाययोजना न केल्यामुळे ग्रामस्थांमध्ये असंतोष वाढला आहे. ग्रामपंचायतीसमोरच इतके मोठे पाण्याचे डबके असताना, ग्रामपंचायत अन्य समस्यांकडे कसे लक्ष देईल, असा प्रश्नही ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. त्यामुळे तातडीने सार्वजनिक बांधकाम विभागाने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

हे हि वाचा

मंत्री अनिल पाटील यांच्या 500 कोटींच्या आपत्ती व्यवस्थापन साहित्य खरेदीवर प्रश्नचिन्ह: भ्रष्टाचाराचा मोठा आरोप?

Post a Comment

Previous Post Next Post